आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:पाच वर्षांत स्त्री जन्मदर वाढला, तर मातांच्या मृत्यूदरात मोठी घट

नगर / दीपक कांबळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी २०१७-२०१८ मध्ये दर हजार मुलांमागे, स्त्री जन्मदर ८९५ होता. नागरिकांमध्ये आलेली जनजागृती व ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सह विविध योजनांच्या यशामुळे स्त्री जन्मदर सरासरी ९१४ वर पोहोचला आहे. तसेच माता मृत्यू दराचा आकडा ४८ वरून २७ वर आणण्यात यश आल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत बाल लिंग गुणोत्तर आणि जीवन चक्र सातत्य राखताना मुली आणि महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण केले जाते. गर्भ लिंग निदान रोखण्याबरोबरच, मुलींचे संरक्षण व शिक्षण यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. जिल्ह्यात २०१७-२०१८ मध्ये स्त्री जन्मदर अवघा ८९५ होता. त्यात वाढ होऊन तो आता सरासरी ९१५ वर पोहोचला आहे. स्त्री जन्मदर आकडा एक हजारीपार नेण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणा तसेच एकात्मिक बालविकास विभागासमोर आहे. तर दुसरीकडे माता मृत्यूचे प्रमाण २०१७-२०१८ या एका वर्षात ४८ होते, ते प्रमाण २०२१-२०२२ मध्ये २७ झाले आहे. माता मृत्युचे प्रमाण कमी होत असले, तरी हा आकडा शुन्यावर नेण्यासाठीही उपाययोजना सुरू आहेत.

या कारणांमुळे घटला जिल्ह्यातील माता मृत्यूदर {महिला गरोदर राहिल्यानंतर आरोग्य व एकात्मिक बालविकास यंत्रणेकडे होते नोंद { अंगणवाडीसेविकेमार्फत गरोदर मातांसाठी आहार पुरवठा केला जातो { शासन मातांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन, नियमित तपासणी { महिला घरी प्रसुत होण्याचे प्रमाण नगन्य, तत्काळ मिळते वैद्यकीय सेवा { गरोदर मातेचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न व आरोग्य सेवा तत्काळ मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...