आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:खुडसरगाव येथेही पिकांच्या पंचनाम्यासाठी मागितले पैसे

देवळाली प्रवराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस भर पडत आहे. नेवाशा पाठोपाठ राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्याचे प्रकार समोर आले. याबाबत आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा दिला.

नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेती पिकाच्या पंचनाम्यासाठी पैसे मागीतल्याचा प्रकार घडला असता कृषी सहायक, ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असताना खुडसरगाव येथील अप्पासाहेब देठे, अभिमन्यू चव्हाण, किशोर देठे, प्रकाश थेवरकर आदींनी तसेच पाथरे येथील शेतकऱ्यांनी महसूलच्या कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी आमदार कानडे यांच्याकडे केली.

आमदार कानडे यांनी या बाबींची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली. प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही, तर विधानमंडळात आवाज उठवणार असल्याचा इशारा आमदार कानडे यांनी दिला. नेवासे तालुक्यातील तक्रारीवर महसूलमंत्री विखे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

बातम्या आणखी आहेत...