आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:कोपरगाव तालुक्यात 122 जागांवर कोल्हे गटाचे वर्चस्व : स्नेहलता कोल्हे

कोपरगाव शहर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कोल्हे गटाने दणदणीत विजय मिळवला. सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाचे उमेदवार निवडून आले. तर सदस्यांच्या एकूण २५७ जागांपैकी १२२ जागा जिंकून कोल्हे गटाने वर्चस्व सिद्ध केले. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, सदस्यांच्या सर्वाधिक जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, अशी माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

या निवडणुकीत संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले. सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बिपीन कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंतिम निकालानंतर शिंगणापूर, धारणगाव, खिर्डीगणेश, करंजी, खोपडी, तळेगाव मळे, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, बहादराबाद या ग्रामपंचायतींचे सरपंचपद कोल्हे गटाकडे आले आहे.

काळे गटाचे १४ सरपंच, परजणे गटाचा १, शिवसेना १ तसेच २ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले आहेत. सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजप म्हणजेच कोल्हे गटाने एकूण २५७ पैकी सर्वाधिक १२२ जागा जिंकून आघाडी घेतली असून, काळे गटाला (राष्ट्रवादी काँग्रेस) फक्त ११४ जागा मिळाल्या आहेत. परजणे गटाला ४, शिवसेनेला ६ जागा मिळाल्या आहेत, तर ११ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत, असे कोल्हे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...