आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पावसानंतर आता वाढत्या उन्हाचा कहर सुरू झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे, असा वेधशाळेचा अंदाज आहे. कोपरगावात तामपानाचा पारा ४२ अंश सेल्सिअस इतका नोदविला गेला. त्यामुळे दिवसभर जनतेच्या अंगाची लाहीलाही झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, सतर्कता बाळगा. उष्माघाताचे लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने जनतेला केले. शनिवारी दुपारी अक्षरशा अघोषित संचार बंदीसारखे चित्र दिसत हाेते.
खेडेपाडा वाड्या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. गोदावरी नदीत पाणी आहे. परंतु ते खराब झाले आहे, त्यामुळे रानवाण भटकणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जनता अवकाळी पावसाने मधेच पडणारी थंडी याने त्रस्त झाली. अाता मात्र उष्माघाताचा प्रकोप पाहता दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर पडताना टोपी, कानाला उपरणे अथवा छत्रीचा वापर करा.
शक्यतो दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत घराबाहेर पडू नका, पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या. सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे व झडपांचा वापर करावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, उन्हात काम करणाऱ्यांनी ओल्या कापडाने डोके, मान व चेहरा झाकावा, चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, दारू, चहा, कॉफी घेऊ नये, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने व डॉक्टरांनी नागरिकांना केले. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली. अजून ती तीन ते चार दिवस राहील. सकाळपासूनच गरम होण्यास सुरुवात होते. विजेचा लपंडावा ने नागरिक हैराण झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.