आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामिका एकादशी निमित्त रविवारी (24 जुलै) नेवासे शहरात पाच ते सहा लाख भाविक दर्शनाला येणार आहेत. या एकादशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (23 जुलै) नेवासे शहरातील मराठी मुलांच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणीसह विविध संतांच्या,समाजसुधारक यांच्या वेशभूषा करीत स्वछता संदेश,पर्यावरण संवर्धन व सर्वधर्मसमभाव ही समाजप्रबोधनावर आधारित दिंडी काढली.
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा नेवासे खुर्द मुले यांच्या बाल वारकऱ्यांची समाजप्रबोधनपर दिंडीत विठ्ठल रुख्मिणी सह संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई,भगवान शंकर,समाज सुधारक संत गाडगेबाबा आदींची केलेली वेशभूषा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या.
शाळेपासून दिंडी हाती टाळ, मृदंग, विविध घोषवाक्य फलक, वृक्ष व ग्रंथ दिंडी, हाती तिरंगा घेऊन खोलेश्वर गणपती मंदिरा समोरून नगरपंचायत चौक मधून संत ज्ञानेश्वर मंदिर रोडकडे प्रस्थान केले. नगर पंचायत ,संत तुकाराम महाराज मंदिर चौकात शाळेतील शिक्षक राहुल आठरे यांनी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान जनजागृतीपर वेशभूषा करून हाती तिरंगा घेत या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले. मंदिरात पोहोचल्यावर संस्थान प्रशासनाने या दिंडीचे स्वागत केले व विविध व्यक्तींनी या वारकऱ्यांना खाऊचे वाटप केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.