आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव:पारनेरात कांद्याला मिळाला दोन हजार रुपयांपर्यंत भाव

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावात थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. पारनेर बाजार समितीमध्ये ७ ते ८ लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल १६०० ते २००० हजार रुपये भाव मिळाला. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी ३ हजार ६३७ कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबरच्या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल ११०० ते ११५०० रुपये भाव मिळाला.

अहमदनगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ५२९ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादनही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाल्याचे दिसून आले. शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. पारनेर बाजार समितीमध्ये रविवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस कांद्याचा लिलाव होतो. रविवारी (१२ जून) पारनेर बाजार समितीत कांद्यचे लिलाव झाले. यावेळी सुमारे ३ हजार ६३७ कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यातील ७ ते आठ लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते १५०० रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला म्हणजे जोड कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ६०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली. कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील कांदा विक्रीसाठी काढत नव्हते. परंतु सध्या पेरणीच्या कामांसाठी सर्व शेतकऱ्यांना बी-बियाणे भरण्यासाठी पैशाची गरज भासते. त्यातच आज झालेल्या लिलावात काही लॉटला १६०० ते २००० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाल्या यापुढे कांद्याची आवक वाढू शकते, अशी माहिती सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...