आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला प्रवेश नाही‎:पाथर्डीमध्ये दहावी परीक्षेतील‎ एजंटांचा गोरखधंदा पुन्हा उघड‎

पाथर्डी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेला दोन विद्यार्थ्यांना‎ पास करून देण्यासाठी एजंटला पुणे‎ येथील महिला पालकाने तीस हजार‎ देही हॉल तिकिटाचे कारण देता‎ परीक्षेला प्रवेश न दिल्याने‎ विद्यार्थ्यांच्या आईने पाथर्डी‎ बसस्थानकावर आर्त टाहो‎ फोडल्याने काहीकाळ गोंधळाची‎ वातावरण निर्माण झाले. यामुळे‎ जिल्ह्याबाहेरील विद्यार्थांना कॉपी‎ पुरवून पासिंगच फॉर्मुला राबवणाऱ्या‎ एजंटचा गोरखधंदा उघड झाला.‎ पुणे येथील या महिलेच्या दोन‎ मुलांना पाथर्डी येथील एका एजंटाने‎ दहावी परीक्षेत तुम्हाला कॉपी करून‎ पास करून देतो, असे सांगून‎ प्रत्येकी १५ हजार रुपये उकळले.‎ परंतु ऐनवेळी एकाच विद्यार्थ्यांचे‎ हॉल तिकीट आले व दुसऱ्याचे‎ आले नाही. त्यामुळे पुणे येथून‎ पाथर्डी येथे दोन दिवसांपासून तळ‎ ठोकून असलेल्या मातेच्या भावना‎ अनावर होऊन तिने पाथर्डी बस‎ स्थानकवासी एंटल्या नावाने टाहो‎ फोडला.

माझे पैसे मला परत द्या,‎ माझ्या मुलांना मला परत घेऊन‎ जायचे आहे, तुम्ही मला फसवले.‎ आम्ही खूप गरीब माणसे आहोत,‎ आम्ही पै-पै करून जमवलेले पैस‎ परत द्या, असे म्हणून सविता सिंग‎ नामक महिलेने बसस्थानकावर टाहो‎ फोडल्याने त्या ठिकाणी बघ्यांची‎ गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण‎ निर्माण झाले. काही नागरिकांनी‎ महिलेची समजूत काढून संबंधित‎ कॉपी पुरवणाऱ्या एजंटावर फिर्याद‎ दाखल करण्यासंदर्भात सल्ला‎ दिला. एजंटाचा धाक व पुढील‎ परीक्षेत पास करून देण्याच्या‎ एंटल्या आश्वासनामुळे महिलेने‎ फिर्याद देण्याचे टाळले. यावरून‎ पाथर्डी तालुक्यात दहावी व‎ बारावीच्या परीक्षेमधून लाखो‎ रुपयांची उलाढाल करून कॉपी‎ पुरवून पासिंग करून देण्याचा‎ फार्मूला पुन्हा समोर आला.‎

बातम्या आणखी आहेत...