आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजादूची कांडी फिरवून कोणी विकास करेल अशी अपेक्षा करणे सोडून द्या. राजकारणाची लढाईच नाही, तर युद्ध देखील मित्रमंडळाच्या जीवावर सहज जिंकता येते, असे प्रतिपादन प्रवीण घुले यांनी केले. ते कर्जत येथे कार्यकर्ता स्नेह-संवाद मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात घुले यांनी लोकप्रतिनिधींवरही सडकून टीका केली.
यावेळी सरपंच विलास निकत, विष्णू महाराज परदेशी, नजीर शेख, ओंकार गायकवाड, कृष्णा लोखंडे, आदेश शेंडे, प्रशांत गायकवाड आदींनी देखील मनोगत व्यक्त केले. तर घुले म्हणाले, आम्ही प्रत्येक वेळी मतदारसंघाच्या विकासासाठी स्वत:च्या भावनेला मुरड घातली.
मात्र स्वाभिमानास तडा जाऊ दिला नाही. प्रत्येक वेळी जनतेच्या विकासासाठी काही करता येईल यासाठी प्रयत्न केला. राजकारणात स्वार्थ न पाहता काम करतो, तोच जनतेला भावतो. आगामी काळात आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला. प्रास्ताविक बाळासाहेब लोंढे यांनी तर आभार सुरेश खिस्ती यांनी मानले.
पवारांवर केली टीका
रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीवर घुले यांनी अप्रत्यक्ष टीका केली. विधानसभेचा निकाल लागला आणि त्यांच्या स्वभावातील बदल मतदारसंघास पहावयास मिळाला. ज्यांनी त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. लोकांचे प्रश्न घेवून गेल्यास त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.