आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मंडळांना सूचना:पुसद तालुक्यात ३०८ सार्वजनिक मंडळांनी केली श्रीची प्राणप्रतिष्ठापना

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात व वाजत गाजत शहरासह तालुकाभरात बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाले. सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले. संपूर्ण तालुक्यात ३०८ सार्वजनिक मंडळांना चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्राणप्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली आहे.शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहरांमध्ये ४२ तर ग्रामीण भागामध्ये ३० असे एकूण ७२ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली आहे. तर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४६ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली आहे. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील एकूण ४५ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली असून त्यात २० मंडळींना एक गाव एक गणपतीसाठी परवानगी दिली आहे. वसंत नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरातील २५ व ग्रामीण भागातील २० मंडळांना श्रीची प्रतिष्ठापना करण्यासाठी परवानगी दिली आहे.

यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असल्याने सर्वत्र उत्साह पहावयास मिळत आहे. शहरातील बाजारपेठ देखील श्री गणेशाच्या आगमनाने विविध सजावटीने व आकर्षक फुलांनी सजली आहे. शहरातील नेते मंडळी, ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, अधिकाऱ्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज बुधवारी विराजमान झाले आहे. बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसांच्या उत्साह पर्वाला प्रारंभ झाला. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

संपूर्ण तालुक्यामध्ये श्रींच्या प्रतिष्ठापणा कडक निर्बंध लावून परवानगी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहे. सोबतच लाऊड स्पीकरचा आवाज देखील मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. कायद्याचे पालन न करणाऱ्या मंडळावर कडक कारवाई देखील केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...