आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक 230 रुपये भाव:11 हजार 441 क्रेट डाळिंबाची आवक, कांद्याची 19 हजार 587 गोणी आवक

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (2 सप्टेंबर) ११ हजार ४४१ क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो १२६ ते २३० रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो ८१ रुपये ते १२५ रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

दरम्यान, बाजार समितीत मागील एक महिन्यात प्रथमच डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो २३० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र ७६ हजार १७२ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक ३७ हजार ६७७ हेक्टर क्षेत्र डाळिंब बागाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात. राहाता बाजार समितीत शुक्रवारी शेतकऱ्यांनी ११ हजार ४४१ क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक १२६ रुपये ते २३० रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो ८१ ते २०० रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो ४१ ते ८० रुपये, तर चार नंबर दर्जाच्या डाळिंबांना प्रतिकिलो १० ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत शुक्रवारी कांद्याचे लिलावही झाले. यावेळी १९ हजार ५८७ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ७५० ते ११५० रुपये, तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये, गोल्टी कांद्याला ७०० ते ९००, तर जोड कांद्याला प्रतिक्विंटल १०० ते २०० रुपये भाव मिळाला.

शेतकऱ्यांनी राहाता बाजार समितीत आपला शेतमाल प्रतवारी करून आणावा. प्रतवारी केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो, असे आवाहन राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

सोयाबीनच्या भावात घसरण

राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२ सप्टेंबर) १० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावामध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५०९९, तर कमाल ५२८२ रुपये भाव मिळाला. गव्हाला प्रतिक्विंटल २५०० रुपये, तर हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४२८१ रुपये भाव मिळाला. यावेळी ३४ क्विंटल बाजरीची आवक झाली होती, यावेळी बाजरीला प्रतिक्विंटल २१०९ ते २६९२ रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहता बाजार समितीचे सचिव देवकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...