आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच निवडणूक:राहुरी तालुक्यात सरपंचपदासाठी 88, तर सदस्यपदासाठी 439 उमेदवारी अर्ज दाखल

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या निवडीसाठी ८८ तर सदस्य पदासाठी ४९३ अर्ज दाखल झाले आहेत. ब्राम्हणगाव भांड येथे सरपंचपदासाठी सविता राजेंद्र पवार यांचा अनुसूचित जाती जमातीमधून एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबरला असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सरपंचपदासाठी सर्वात जास्त १८ अर्ज आरडगाव तर ब्राम्हणगाव भांड येथे अवघा १ अर्ज दाखल झाला. सदस्य पदासाठी कोंढवड ग्रामपंचायतीत सर्वाधिक ७१ तर ब्राम्हणगाव भांड ग्रामपंचायतीसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सरपंच व सदस्यपदासाठी आरडगाव, केंदळ खुर्द, सोनगाव, ताहाराबाद, तुळापूर, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, कोंढवड सरपंचपदाचे १२, सदस्यपदाचे ७१, मांजरी येथे सरपंचपदाचे ५, सदस्यपदाचे ३५, ब्राम्हणगाव भांड येथे सरपंचपदाचे १, सदस्यपदाचे १६, मानोरी सरपंचपदासाठी १२, सदस्यपदासाठी ६४ अर्ज दाखल झाले. ७ डिसेंबरला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे.

बातम्या आणखी आहेत...