आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला‎ दिन:रेणुका माता मंदिरात 150  महिलांनी‎ एकत्रित संकल्प करत केले कुंकूमार्चन‎

नगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रोफेसर कॉलनी येथील रेणुका माता मंदिरात‎ श्रीहरिहर सद्गुरू शक्तिपीठ, सिंगाजीनगर‎ येथील भक्त परिवाराच्या वतीने महिला‎ दिनाचे औचित्य साधत कुंकूमार्चनाचे‎ आयोजन करण्यात आले होते. १५०‎ महिलांनी एकत्रित संकल्प करून श्रीहरिहर‎ सद्गुरु शक्तिपीठ येथील अंबरीश महाराज‎ व अनिरुध्द महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली‎ कुंकूमार्चन केले.‎

गुरुवारपासून तीन दिवस चालणाऱ्या‎ पंचकुंडात्मक नवचंडी यागाप्रसंगी नवचंडी‎ याग पूजन, हवन, सामूहिक पादुका पूजन व‎ अभिषेक कुंकूमार्चन, आरती, प्रसाद,‎ सुश्राव्य गायन, सांपद्रायिक हरीपाठ, प्रवचन,‎ किर्तन, पंचपदी आदीसह विविध कार्यक्रम‎ होणार आहेत.‎ सुयोग ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मोहन कामथ,‎ उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रभाकर प्रताप , रेणुका माता‎ मंदिराचे पुजारी रत्नाकर कुलकर्णी,सविता‎ कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...