आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२५ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान ८ लाख साईभक्तांनी साईसमाधीचे दर्शन घेत साईबाबांच्या झोळीत तब्बल २१ कोटी ८६ लाख रुपये दान दिले आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, साईआश्रम भक्त निवास, द्वारावती भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास, साईप्रसाद निवास आदींद्वारे १ लाख २८,०५२ साईभक्तांची निवास व्यवस्था करण्यात आली. मंडपात १६,२०७ भाविक अशी एकूण १ लाख ४४,२५९ भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली. १७१ साईभक्तांनी रक्तदानही केले.
रोख मिळाले १६ कोटी ८४ लाख ६९, ३९६ रुपये
दानपेटी ~८.७८ कोटी ७९,०४८
देणगी काउंटर ~३.६७ कोटी ६९८
डेबिट-क्रेडिट कार्ड ~२.१५ कोटी १८,४९३
ऑनलाइन ~१.२१ कोटी २,५३१
चेक-डीडीद्वारे ~९८.७९ लाख ९७३
मनीआर्डरद्वारे ~३.२१ लाख ६५३
सोने
१ किलो ८४९ ग्रॅम (मूल्य : ९० लाख ३१,१६७ रुपये)
चांदी
१२ कि. ६९६ ग्रॅम (मूल्य : ६ लाख ११,४७८ रुपये)
ऑनलाइन व सशुल्क दर्शन, आरती पासेस
१ लाख ९१,१३५ भक्तांनी दर्शन घेतले. याद्वारे ४ कोटी ५ लाख १२,५४२ प्राप्त.
साई प्रसादालय ५ लाख ७०,२८० भाविकांनी मोफत प्रसाद भोजन, तर १ लाख ११,२५५ भाविकांनी घेतला अन्नपाकिटांचा लाभ.
लाडू प्रसाद
८ लाख ५४,२२० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली. याद्वारे १ कोटी ३२ लाख १९,२०० प्राप्त.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.