आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड नामजाप-पारायण प्रारंभ:तपोवन स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड नामजाप-पारायण प्रारंभ

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-औरंगाबाद रोडवरील तपोवन येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. श्री. स्वामी समर्थ मंदिरात अखंड नाम जप व पारायणास प्रारंभ झाला. भाविकांनी या सेवेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या दत्त जयंती सोहळ्यास पहाटेच्या भुपाळी आरतीने प्रारंभ करण्यात आला. अखंड नामजप करीता महिला मोठ्या संख्येन सहभागी झाल्या आहेत. तर श्री गुरुचरित्र पारायणासाठी स्त्री-पुरुषांनी गर्दी केली. भागवत ग्रंथ, दुर्गासप्तपदी, मल्हारी, नवनाथ आदि ग्रंथ पारायण सोहळा सुरु आहे.

सप्ताहाची सांगता ८ डिसेंबरला होणार असून, सकाळी दहा वाजता आरती, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र प्रतिनिधी सोनाली बबन पालवे, एकनाथ खिलारी, भाऊसाहेब देशमाने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...