आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैल पोळा:नगर अन् कामरगावात लाखाचे सर्जा-राजा ठरणार आकर्षण

नगर /पाथर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण. या दिवशी बैलांचा थाट असतो. आपली बैलजाेडी सगळ्यात उठून दिसावी यासाठी शेतकरी सर्जा राजाचा श्रृंगार करत असतो.यंदा कोरोनामुळे दाेन वर्षानंतर पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या बैलपोळ्यात महागडी जोडी म्हणून मिरवण्याचा मान नगरच्या शेळके व कामरगाव येथील ठोकळ कुटुंबाला मिळणार आहे. या दोघांनी अनुक्रमे ३ लाख ६१ हजार आिण २ लाख २१ हजार रुपयांत बैलजोडी खरेदी केली. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरच्या अशोक शेळके या शेतकऱ्याने तब्बल ३ लाख ६१ हजार रुपयाची बैल जोडी पाथर्डीच्या बैल बाजारातून विकत घेत त्याची पाथर्डी शहरातून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली.

शुक्रवारी बैलपोळा सण आहे. नगरच्या अशोक शेळके या शेतकऱ्याने सणासाठी दरात दारात रुबाबदार बैल जोडी घेण्याचे ठरवत जिल्ह्यातील दोन-तीन ठिकाणी जनावरांच्या बाजारात पाहणी केली.पाथर्डीचा जनावरांचा बाजार प्रसिद्ध असल्याने बुधवारी त्यांनी पाथर्डीतील बाजार पाहत पागोरी पिंपळगावच्या सादिक शेख यांच्या मालकीची खिलार जातीची बैल जोडी पसंत केली ३ लाख ६१ हजार रुपयांना सौदा ठरला. शेळके यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्जा राजाच्या थाट मिरवत त्यांनी वाजत गाजत बैल जोडी नगरला वाहनातून नेली. खरा शेतकरी यांत्रिक युगातही जनावरावर किती मनापासून प्रेम करतो याची प्रचिती अगदी सहजपणे मिळाल्याने बाजार करूनसह बाजारपेठेतील सर्वांनीच शेळके यांच्या बैलावरील प्रेमाचे व मायेचे कौतुक केले.

पोळ्याच्या पूजेसाठी कामरगाव येथील प्रगतशील शेतकरी व दत्त देवस्थानचे प्रमुख बापू माऊली ठोकळ यांनी काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील जनावरांच्या बैल बाजारातून २ लाख २१ हजार रुपयांची नव्या खिलारी बैलांची खरेदी केली. ते शुक्रवारी (२६ ऑगस्ट) कामरगाव येथे या बैलांची मिरवणूक काढणार आहेत. कामरगाव येथील बापू माऊली ठोकळ हे दरवर्षी बैलपोळ्याची आधी राज्यभरातील बैल बाजारात फिरून बैलजोडी खरेदी करतात. या उपक्रमाचे हे त्यांचे १४ वे वर्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...