आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:श्रीरामपूर शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण प्रश्न ऐरणीवर

श्रीरामपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर शहरातील मेन रोड, शिवाजी रोड,नेवासा रोड,संगमनेर रोड आदी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण प्रश्न ऐरणीवर असतांना आता शहरातील अंतर्गत रस्त्यावरही अतिक्रमण वाढले असल्याने या भागात छोटी चारचाकी वाहने घेऊन जाणे रहिवाशांना जिकरीचे झाले आहे.श्रीरामपूर शहरात मेनरोड, शिवाजी रोड, नेवासे रोड,संगमनेर रोड,बेलापूर रोड,गोंधवणी रोड हे मुख्य रस्ते समजले जातात. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. याशिवाय या मुख्य रस्त्यांना इतर अनेक उपरस्ते जोडलेले आहेत. या रस्त्यांवरूनही मोठी वाहतूक आहे.

मागील काही वर्षांपूर्वी पालिकेने पथ मार्गाची निर्मिती केलेली आहे. त्याच्या आत व्यावसायिक किंवा कार्यालयांची हद्द आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व खरेदीसाठी अथवा कार्यालयात येणाऱ्या लोकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग असावी यासाठी पथमार्गा बाहेरच्या बाजूने नगरपालिका व पोलिस प्रशासनाने पांढरे पट्टे मारलेले आहेत.

या पट्टयाबाहेर वाहने लावलेली असतील तर दंडात्मक कारवाई केली जात होती.मात्र अलिकडच्या काळात ही कारवाई थंडावली आहे.त्यातल्या त्यात श्रीरामपुरात वाहतूक पोलीस स्वतंत्र शाखा होती ती बंद करण्यात आली असून त्यामधील पोलिसांची शहर व तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.आधीच पोलीस बळ कमी त्यात वाहतूक शाखा बंद केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास प्रशासनाला अडचणी येत होत्या.मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगसह रस्त्यावरील अतिक्रमनाला ला शिस्त लावणे गरजेचे आहे.

शिवाय शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता,नेवासा रस्ता व संगमनेर रस्त्यावर अनेक खाजगी व राष्ट्रीयीकृत बँका आहेत.या बँकांचे कार्यालये ज्या इमारतीमध्ये आहे तेथे पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने भर रस्त्यावर वाहने लावले जातात.त्यामुळे वाहतूक कोंडी होते.या सर्व बँकांना नगरपालिकेने नोटिसा जारी केल्या आहेत. बँका, कार्यालये व गर्दी होणाऱ्या व्यावसायिकांनी स्वतः सुरक्षा रक्षक नियुक्त करणे गरजेचे आहे.

जातात.शिवाय अनेक दुकानदारांची रस्त्यावर अतिक्रमणे आहेत.अनेकांनी दुकानापुढे लोखंडी अँगल लावून ठेवलेले आहेत.त्यामुळे गाड्याही लावता येत नाहीत. तर दुसरीकडे शहरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक भागात दुतर्फा अतिक्रमण झाल्याने या भागात जाण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गटारीच्या बाहेर अनेकांनी अतिक्रमण केल्याने अंतर्गत रस्ते अरुंद झाले आहेत.

खातरजमा करून अतिक्रमण हटवणार
शहरातील काही भागात अतिक्रमणाची अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समजले आहे.याबाबत खातरजमा करून घेतली जाईल.नियमानुसार शहरातील अंतर्गत रस्त्यावर असे अतिक्रमण आढळले तर ते हटवले जाईल.'' गणेश शिंदे, मुख्याधिकारी.

...तर रुग्णवाहिका कशी जाणार ?
काही भागातील अतिक्रमणामुळे अंतर्गत रस्ते एवढे अरुंद झाले आहेत की छोटी चारचाकी वाहने जाणेही जिकरीचे आहे.उद्या भविष्यात दुर्दैवाने काही अनर्थ घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन गाडी कशी न्यायची हा प्रश्न भेडसावणार आहे.त्यामुळे रहिवाशांनी समजून उमजून झालेले अतिक्रमण स्वतःहून काढून रस्ता रुंद ठेवणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...