आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरित्या दारू विक्री:शहरात पोलिसासह एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी परवानगी देऊन महिना ३० हजारांचा हप्ता घेणाऱ्या पोलिस अंमलदारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली. अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय ३५ रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत.

मंगळवारी पाइपलाइन रोडवरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तोफखाना हद्दीतील तक्रारदारास विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके याच्यामार्फत तक्रारदाराकडे ३० हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीवरून २१ जुलै रोजी पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. मंगळवारी एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यातर्फे तक्रारदाराकडून ३० हजारांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

बातम्या आणखी आहेत...