आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षक हेच शिल्पकार

राहुरी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज साक्षर आणि सुसंस्कृत करण्याचे काम शिक्षकाचे असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षक हेच शिल्पकार आहे, असे प्रतिपादन राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले.शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील टाकळीमिया येथील संत ज्ञानेश्‍वर विद्यालयातील शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

बाळासाहेब जाधव म्हणाले शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करणे आवश्यक आहे.या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास ज्ञानदेव निमसे,मुख्याध्यापक खाडे,पर्यवेक्षक चव्हाण,आढाव सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...