आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती:ज्या शेतातमध्ये उभे आयुष्य गेले, तेथेच वडिलांच्या रक्षांचे विसर्जन

सोनई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबातील व्यक्तीचे दुःखद निधन झाल्यानंतर अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या रक्षा नदी संगमावर विसर्जित करण्यात येतात. बेलपिंपळगाव येथील अध्यात्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे व प्रगतशील शेतकरी स्व. भाऊसाहेब एकनाथ सरोदे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या रक्षा नदीपत्रात विसर्जित न करता ज्या शेतात ज्यांचे आयुष्य गेले, त्याच शेतात त्यांच्या रक्षा विसर्जित करून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आंब्याचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेल्या वृक्षाचे संगोपन करून त्यांच्या स्मृतीची जपवणूक करू असे सोमनाथ सरोदे म्हणाले. वडिलांच्या निधनानंतर झालेल्या दुःखातून सावरत त्यांच्या रक्षा शेतातच विसर्जित करत वृक्षारोपन केले, असे कृष्णा शिंदे ग्राम पंचायत सदस्य बेलपिंपळगाव यांनी सांगितले. याप्रसंगी कृष्णा शिंदे ग्राम प सदस्य बेलपिंपळगाव, अशोक शिंदे, रघुनाथ सरोदे, पोपट सरोदे व सरोदे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...