आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 हजार 533 क्रेट डाळिंबाची आवक:राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळाला प्रतिकिलो 205 रुपयांपर्यंत भाव

अहमदनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (1 ऑगस्ट) 13 हजार 533 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो 151 ते 205 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 91 ते 150 रुपये भाव मिळाला. कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1001 ते 1373 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

राहाता बाजार समितीत सोमवारी शेतकऱ्यांनी 13 हजार 533 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 151 ते 205 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 91 ते 150 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 51 ते 90 रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबांना 10 ते 50 रुपयांपर्यंत भाव मिळाला. नगर जिल्ह्यात फळबागांत डाळिंब पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे राहाता बाजार समितीत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. मागील आठवड्यापासून डाळिंबाचे बाजारभाव स्थिर आहेत.‌ तसेच कांद्याची आवकही चांगली असून भावही स्थिर आहेत.

कांद्याला प्रतिक्विंटल 1373 रुपये भाव

राहाता बाजार समितीत सोमवारी लुज कांद्याचे लिलावही झाले. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1001 ते 1373 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 751 ते 1000 रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 400 ते 750 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...