आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आजच्या आधुनिक युगात सहकारी संस्था हायटेक हाेणे गरजेचे ; विखे

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने काळाची गरज ओळखून सभासदांच्या सोयीसाठी सुरू केलेले संगणक प्रणाली व मोबाईल ॲप हे आधुनिक युगातील एक नवीन पाऊल आहे. अॅपच्या सुविधामुळे सभासदांना संस्थेची संपूर्ण माहिती स्वतःच्या मोबाईलवर मिळणार असून त्यामुळे या संस्थेतील संचालकांचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्याचे स्पष्ट होते. आजच्या आधुनिक युगात सहकार क्षेत्रातील संस्था हायटेक होणे गरजेचे आहे. जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम पतसंस्थेला ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्षात सभासदांना संचालक मंडळाने दिलेली ही एक भेटच ठरली आहे. यापुढेही संचालक मंडळांनी संस्थेचा पारदर्शी कारभार सुरू ठेवावा, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी होते. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून संगणक प्रणाली व मोबाईल ॲपचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखापती, संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष व कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर, संस्थेचे माजी चेअरमन नारायणराव तमनर, संचालक नवनाथ घोंगडे, शांताराम आवारी, ललित पवार, शिवाजीराव तोरणे, दीपक वाळके, प्रियंका मिसाळ, दत्तात्रय गडाख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर हळगावकर आदींसह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...