आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:‘विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात’ ; रस्त्यांची दुरावस्था

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती असलेला जुना बाजार या रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्त झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. नागरिकांना सर्वप्रकारच्या सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्न सोडविले जाव्यात, यासाठी विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून प्रश्न सोडवत आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अविनाश घुले यांनी केले.

प्रभाग क्र.११ मधील ए-१ व्हीडिओ हॉल ते काळा मारुती मंदिर ते धरती चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामाची पाहणी करुन नगरसेवक घुले यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, बाळासाहेब भंडारी, कौसरभाई, दादासाहेब घोरपडे, पप्पू गायकवाड, तुकाराम घोरपडे, रिजवान तांबोळी, आनंद बोरा, पवन गुंदेचा, हर्ष घोरपडे, रोहित चुत्तर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...