आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरात घसरण‎:दोन महिन्यांत कांदा‎ दरात कमालीची घसरण‎

नगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या‎ प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन‎ घेतले जाते. डिसेंबर २०२२ मध्ये एक‎ नंबर कांद्याला २ हजार ते ३‎ हजारांचा भाव मिळत होता. मागील‎ दोन महिन्यात या दरामध्ये झालेल्या‎ कमालीच्या घसरणीमुळे एक नंबर‎ कांद्याला अवघा सातशे पाच ते एक‎ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत‎ आहे. तर गोल्टी कांदा अवघा ४००‎ ते ७०० रुपये प्रति क्विंटल दराने‎ विकला जात आहे. कांदा दरात होत‎ असलेली कमालीची घसरण‎ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी‎ आणणारी ठरली आहे.‎

राज्यात नाशिक व अहमदनगर‎ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे‎ उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी‎ समाधानकारक भाव नसल्याने‎ गावरान कांदा शेतकऱ्यांनी चाळीत‎ भरून ठेवला होता. चांगला भाव‎ मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा‎ शेवटी चाळीतच खराब होण्याची‎ वेळ आली. त्यामुळे मिळेल त्या‎ भावात हा कांदा बाजारात‎ विक्रीसाठी आणला. डिसेंबर नंतर‎ गावरान कांद्याची आवक कमी‎ होऊन लाल कांद्याची आवक‎ वाढली. सुरुवातीला लाल‎ कांद्यालाही दोन ते अडीच हजार‎ रुपयांचा भाव मिळाला.

त्यानंतर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मात्र कांदा दरात सातत्याने घसरण‎ पाहायला मिळाली. जानेवारीनंतर‎ एक नंबर कांदा प्रतिक्विंटल दीड‎ हजारापर्यंत विकला गेला फेब्रुवारीत‎ हाच कांदा एक हजार शंभर रुपये‎ प्रतिक्विंटल दराने विकला. उत्पादित‎ सर्वच मालाला १ नंबरचा दर मिळत‎ नाही. कांद्याची निवड केल्यानंतर‎ त्याची प्रतवारी ठरवली जाते. त्यात‎ एक नंबर कांदा, दोन नंबर कांदा,‎ तीन नंबर कांदा व गोल्टी, अशा‎ पद्धतीने प्रतवारीनुसार लिलावात‎ बोली लावली जाते. समाधानकारक‎ भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा‎ उत्पादन खर्चही निघालेला नाही.‎ अतिवृष्टीमुळे मेटाकोटीला आलेला‎ शेतकरी आता कांदा दरातील‎ घसरणीमुळे आर्थिक संकटात‎ सापडला आहे.‎ किरकोळ बाजारात‎ कांदा वीस रुपये किलो‎ शेतकऱ्याने बाजार समितीत‎ आणलेल्या १ नंबर कांद्याला‎ जास्तीत जास्त दहा ते अकरा रुपये‎ प्रति किलोचा भाव मिळत आहे.‎ परंतु तीन नंबर कांदा किरकोळ‎ बाजारात वीस रुपये किलोने विकला‎ जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या‎ मालाला बाजार समितीतही चांगला‎ भाव मिळावा अशी मागणी होत‎ आहे.‎

किरकोळ बाजारात‎ कांदा वीस रुपये किलो‎
शेतकऱ्याने बाजार समितीत‎ आणलेल्या १ नंबर कांद्याला‎ जास्तीत जास्त दहा ते अकरा रुपये‎ प्रति किलोचा भाव मिळत आहे.‎ परंतु तीन नंबर कांदा किरकोळ‎ बाजारात वीस रुपये किलोने विकला‎ जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या‎ मालाला बाजार समितीतही चांगला‎ भाव मिळावा अशी मागणी होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...