आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:वांबोरीत राष्ट्रवादीचा एक तास सत्कारातच, मात्र मंत्री तनपुरेंनी ऐकले नागरिकांचे प्रश्न

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपक्रमाचे आयोजन केले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. परंतु, कार्यक्रमाचे नियोजन कोलमडल्याने एक तास राष्ट्रवादीऐवजी, एक तास सत्कारासाठी असाच कार्यक्रम रंगला.

‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ कार्यक्रमासाठी मंत्री तनपुरे शनिवारी उपस्थित झाले. वांबोरी येथील स्थानिक नेत्यांसह पोखर्डी, पिंपळगाव माळवी येथून आलेल्या नेते व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यावेळी वांबोरी घाटातील रखडलेल्या कामांचा प्रश्न मांडला, तर स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे घ्या अशीही मागणी झाली. पक्षाच्या ध्येय धोरणावर चर्चा होत असतानाच, सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळाच रंगला होता. त्याचवेळी मंत्री तनपुरे मात्र, नागरिकांचे प्रश्न समजून घेत नागरिकांच्या गराड्यात होते. दुसरीकडे सत्काराची व अल्पोपहार वाटपाचीही धावपळ सुरू होती. मंत्री तनपुरे यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिक मात्र आशेने थांबले होते.

बातम्या आणखी आहेत...