आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन‎:बक्तरपूर व मोर्विसमध्ये 40 लाखांच्या‎ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन‎

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव शहर‎ तालुक्यातील बक्तरपुर व मोर्विस ‎ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ४० लाख ‎रूपये खर्चाच्या विविध विकास‎ कामांचे भुमिपुजने व लोकार्पण ‎ ‎ कार्यक्रम भाजपाच्या प्रदेश सचिव ‎स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते‎ मंगळवारी करण्यात आले. पंतप्रधान ‎नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विकासाचा पाया अधिक मजबूत ‎होण्यासाठी थेट वित्त आयोगामार्फत ‎निधी पुरवल्याने त्यातून जनविकास‎ होत अाहे, असे प्रतिपादन स्नेहलता‎ कोल्हे यांनी केले.‎ बक्तरपुरचे सरपंच संजय बोडखे‎ यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव‎ कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे‎ अध्यक्ष बिपीन कोल्हे, तत्कालीन‎ आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा‎ बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी‎ गांवच्या विकासात दिलेल्या‎ योगदानाची माहिती दिली. दिनेश‎ सानप यांनी प्रास्तविक केले.‎ मोर्विसचे सरपंच एकनाथ माळी‎ यांनी दहा लाख रूपये खर्चाचे‎ सामाजिक सभागृह, पाणीपुरवठा‎ योजना, पारखे वस्ती शाळेचे सुरक्षा‎ कम्पाउंडचे लोकार्पण तर राजेंद्र‎ चोपडे ते वाल्मीक कोकाटे रस्ता‎ खडीकरणाचे भुमिपुजन यासह‎ अन्य विकास कामांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‎ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या‎ अभियानाअंतर्गत मोफत मोतिबिंदु‎ शस्त्रकिया केलेल्या रूग्णांना‎ चष्म्यांचे वितरण करण्यांत आले.‎ कोल्हे म्हणाल्या, कोरोना‎ महामारीनंतर प्रथमच नवरात्र‎ महोत्सव जाहिरपणे साजरा होऊन‎ त्यात सर्वांनाच सहभागी होता आले.‎ ग्रामिण भागातल्या नवदुर्गा या तुम्हा‎ आम्हा सर्वांच्या उद्बोधक अाहेत.‎ गावच्या विकासात काय कमी आहे‎ आणि त्यासाठी काय केले पाहिजे‎ याची शिकवण मिळत असते.‎

शासकीय योजना अनंत आहेत‎ त्याचा लाभ तळागाळातील थेट‎ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यांसाठी‎ आपण सदैव कार्यरत असतो.‎ याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव‎ कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे‎ संचालक मनेष गाडे, विलास माळी,‎ शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष‎ संभाजी गावंड, मुक्ताबाई नागरे,‎ विजय गाडे, शिवाजी घुमरे, विजय‎ साळुंके, माधव गोसावी,‎ बाळासाहेब सानप, बच्छाव सानप,‎ अशोक सानप, माधव बोडखे,‎ सुभाष कांगणे, विश्वनाथ बारगळ,‎ बाजीराव सानप, दौलत सोनवणे,‎ संदिप बारगळ, जनार्दन कांगणे,‎ चेतन बोडखे, गणेश नागरे, के के‎ सानप, गोवर्धन सानप, संजय‎ सानप, दिनेश सानप, संतोष सानप,‎ उध्दव बोडखे, अरूण उगले,‎ मोर्विसचे उपसरपंच अशोक पारखे,‎ गोरख कोकाटे, नामेदव कोकाटे,‎ ग्रामपंचायत सदस्या सुनिता माळी,‎ संतोष सरडे, प्रभाकर पारखे‎ उपस्थित होते शेवटी गोरख कोकाटे‎ यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...