आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत येथील पोलिस अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या 38 निवासस्थानांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (11 मार्च)ला कर्जत येथे झाले. तर जामखेड येथील 38 निवासस्थानांचे कर्जत येथून ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार राम शिंदे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कर्जत येथील या नवीन पोलिस निवासस्थांनाची पाहणी केली. पोलिस कर्मचारी व बॅंड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्जत येथे 3023.15 व जामखेड येथे 2996.31चौरस मीटर मध्ये पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 76 निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. 15 कोटी 21 लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहेत.
या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस नाईक संभाजी वाबळे व पोलीस शिपाई ईश्वर माने यांना 2 बीएचके सदनिकेच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, उप अभियंता विजय भंगाळे, प्रकल्प अभियंता सागर सगळे, कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, जयंत कोलते, हर्षद सारडा व रविंद्र पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या देऊळवाडी (ता.कर्जत) येथील 400/220 के.व्ही.केंद्राचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते यावेळी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
गोदड महाराजांच्या समाधीचे दर्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू गोदड महाराज मंदिरास भेट देत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.फडणवीस यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली. यावेळी त्यांचा देवस्थानच्यावतीने फेटा, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही यावेळी करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.