आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:सेंद्रिय खत प्रकल्प उद्घाटन व डिस्टलरी प्लांटचे भूमिपूजन; गळीत हंगामाची उद्या सांगता

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गळीत हंगामाची सांगता बुधवारी सकाळी ९ वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात यांच्या हस्ते, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली.

मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने यावर्षी कारखाना इतिहासातील कार्यक्षेत्र व बाहेरील सर्व उसाचे विक्रमी उच्चांकी गाळप केले आहे. सांगता प्रसंगी कारखान्याच्या अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत प्रकल्पाचे उद्घाटन व विस्तारित नवीन डिस्टलरी प्लांटचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, शंकरराव खेमनर, अमित पंडित, लक्ष्मण कुटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, संपत डोंगरे, उद्दोजक राजेश मालपाणी, विश्वास मुर्तडक, ॲड. सुहास आहेर, रा. म. कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. समारंभाला सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...