आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:राहुरी कृषी विद्यापीठाच्या बेकरी पदार्थ विक्री केंद्राचे कुलगुरू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राहुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी कृषी विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या बेकरी पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या आयुर्वेदिक कुकीजमध्ये फुले जांभूळ, फुले त्रिफळा, फुले तुलसी, फुले कडीपत्ता, फुले जिंजर (आले) व फुले मशरूम कुकीज यांचा समावेश आहे. या बेकरी पदार्थ विक्री केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना विविध पदार्थांची विक्री करणे बाबतचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, वनस्पती रोग शास्त्र व कृषी अनु जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ. उत्तम चव्हाण, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू आमोलिक, उद्यान विद्या विभागाचे प्रा. डॉ. ढाकरे, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, डाॅ. सचिन सदाफळ, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन, डॉ. बाबासाहेब भिटे, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...