आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेडगाव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, खंडेराव दिघे, सुधाकर सुंबे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुकामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, क्रीडा शिक्षक सोपान तोडमल, एकनाथ होले आदी उपस्थित होते.
डॉ. जावळे म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी, तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे आहेत. स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण होते. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. खेळात खिलाडूवृत्ती असली पाहिजे. खेळामुळे कृतीशिलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते, परंतु नवीन पिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. भाग्योदय विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणांसाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. प्रास्तविकात ज्ञानदेव बेरड म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख होण्यासाठी शालेय उपक्रम राबविण्यात येतात. क्रीडा मेळाव्याने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व बौद्धीक क्षमतेत वाढ होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.