आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत 6 गावांचा समावेश करा, हर्षदा काकडे यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेवगाव तालुक्यातील बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी या गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन केली.

काकडे यांनी मंगळवारी गावातील महिलांसह पाणीप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी व जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मांडला. पाणी योजनेत समावेश नसलेल्या गावातील ग्रामस्थ महिलांनी अधिकाऱ्यांसमोर आक्रोश व्यक्त केला. यावेळी जिजाबाई जाधव, लताबाई लोहकरे, पार्वती पोकळे, उर्मिला जाधव, अनिता जाधव, लंकाबाई भारस्कर, सकुबाई जाधव, रुख्मिनी काकडे, मिरा तेलोरे, विमल काळे, शिलाताई गोरे, मंगल पातकळ, मंगल तेलोरे, भिमाबाई पठाडे, शिला तेलोरे, भगवान शेळके, मोहन गवळी, महादेव पातकळ, दिपक शिंदे, अशोक दातीर आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

शेवगाव तालुक्यातील बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी या गावांचा हातगावसह २८ गावांच्या पाणी योजनेत समावेश होता. त्यानुसार काही ठिकाणी टाक्या बांधण्यात आल्या, परंतु पाणीच मिळत नसल्याने ही गावे वंचित आहेत. या गावात कुठेही पाण्याचा स्त्रोत नसल्याने शाश्‍वत पाणी मिळण्यासाठी बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेचा पर्याय आहे.

या गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव करून, या गावांना हातगावसह २८ गावांच्या पाणी योजनेत सहभागी राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ही गावे आता हातगाव योजनेतून बाहेर पडली आहेत. आता या गावांचा बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत समावेश केल्यास त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. बोधेगाव पाणी योजना ज्या ठिकाणावरून जाते, त्या रस्त्यालगतच ही गावे आहेत, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

आम्ही झेडपीची नाहरकत घेऊ योजना जिल्हा परिषदेची आहे, नंतर ती समितीकडे हस्तांतरीत झाली. आता या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, त्यांना पाणीपुरवठा करणे हाच प्राधान्यक्रम असला पाहिजे. जिल्हा परिषद याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास पत्र देणार आहे. जिल्हा परिषदेची नाहरकत घेतल्यानंतर एमजीपीने पाणी वाढवून यागावांचा समावेश योजनेत करावा.'' हर्षदा काकडे, जिल्हा परिषद सदस्य.

तात्रिक गुंता वाढणार हातगाव व २८ गावे ही योजना १९९७ मध्ये मंजूर झाली असून ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे योजनेत समाविष्ट गावे बाहेर पडली. त्यापैकी ६ गावे रेट्रोफिंटींगसाठी मंजूर असलेल्या बोधेगाव योजनेत समाविष्ट होण्याची मागणी करत आहेत. परंतु, बोधगाव योजना समितीकडे हस्तांतरित असून समितीमार्फत चालवली जात आहे. अशा परिस्थितीत बोधेगाव योजना समितीची नाहरकत मिळालेली नाही. त्यामुळे तांत्रिक गुंता वाढणार आहे.

बोधगाव योजनेत पाण्यापासून वंचित गावांचा समावेश करण्याच्या मागणीबाबत जि.प. सदस्य हर्षदा काकडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...