आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:नगर शहरामार्गे जाणारी - येणारी वाहतूक 45 दिवसांसाठी इतरत्र रस्त्यावरून वळणार, औरंगाबादहून पुण्याला जायला 20 मिनिटे जास्त लागणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतील अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोमवारपासून ( १३ जून) पुढील ४५ दिवसांसाठी शहरातील इतरत्र रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, नगर शहराअंतर्गत होणाऱ्या एकेरी वाहतुकीमुळे मराठवाड्यासह औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याहून नगर मार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनचालकांना २० मिनिटे जास्त वेळ लागू शकेल.

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्याच्या कामात स्टेट बँक चौकात उड्डाणपुलाचे पिलर टाकले जातील. त्यासाठी स्टेट बँकेच्या चौकाच्या पुढचा रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे या रस्त्यावर सोमवारी (६ जून) सकाळपासूनच दिवसभर वाहतूक कोंडी होती. हे काम सुरू असल्यामुळे त्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. शिवाय या भागांत वाहतूक कोंडीदेखील होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासनाबरोबरच आमची चर्चा झाली आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत १३ जूनपासून बदल करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...