आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला सूचना:एसटी सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी : जिल्हाप्रमुख झावरे

कोपरगाव शहर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीच्या सवलत पाससाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा. कोपरगाव एसटी महामंडळ प्रशासनाने सवलतीच्या पासच्या कामाचा भार जास्त असल्याने कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये ड्युटी लावावे जेणेकरून जास्त वेळ कामकाज चालेल. विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळविण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी कोपरगाव आगार प्रशासनासमोर केली. याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना एसटीचा पाससाठी कॉलेज बुडवून रांगेत उभे असून देखील त्यांना पास मिळत नाही. या त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थ्यांनी ही गंभीर बाब शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची भेट घेऊन त्यांना सांगितली. जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे यांनी बसस्थानकात जाऊन विद्यार्थ्यांची अडचण आगार प्रशासनाला भेटून सोडवण्याच्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...