आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणीसाठी रुग्णांनी गर्दी:साथीच्या रुग्णात वाढ; सिव्हिलची ओपीडी फुल्ल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वातावरण बदलताच साथीच्या रुग्णात वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षात सोमवारी उपचार व तपासणीसाठी रुग्णांनी गर्दी केली होती. खासगी रुग्णालयातही तपासणीसाठी गर्दी वाढली. नगर जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला आहे. शहराचे तापमान २० अशांवरुन खाली आले आहे. तापमानात घटल्यानंतर साथीच्या व अन्य आजाराचे रुग्ण सध्या शहर व परिसरात आढळून येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण पक्षात सकाळपासूनच औषध उपचार व तपासणीसाठी रुग्ण गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान साथीच्या आजारात वाढ झाली असतानाच कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेने उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...