आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत देशात सुगंधी वनस्पतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. साधारण दरवर्षी २०० मेट्रिक टन सुगंधी तेलाची आयात करावी लागते. त्यामुळे सुगंधी वनस्पती जिरेनियम लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवावे, असे प्रतिपादन राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली देहरे येथील जिरेनियम सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योगास, तसेच राज्य पुरस्कृत गळित धान्य उत्पादन व मूल्य साखळी संवर्धन अंतर्गत गोरक्षनाथ शेतकरी गटास चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, ‘आत्मा''चे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र माळी, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, सरपंच हिराबाई करांडे, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, विठ्ठल पठारे, संजय काळे, विजय लांडगे, शेतकरी बी. जी. लांडगे, रघुनाथ करांडे, उज्ज्वला काळे, प्रवीण करांडे, सोमनाथ काळे, कृषी सहाय्यक कविता मदने, सुनीता गिरी, अभिजीत डुकरे आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, बदलत्या हवामानामुळे वातावरणात जिरेनियमच्या पिकाची लागवड फायदेशीर ठरते. हमी भावात खरेदी असल्याने या पिकाचे शाश्वत चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीकडे वळावे, असे ते म्हणाले. शिवाजी जगताप म्हणाले, २०१७ मध्ये कृषी विभागांतर्गत कृषी अभ्यासदौरा आयोजित करून शेतकऱ्यांना सातारा येथील जिरेनियमची शेती दाखविण्यात आली. यातून विक्रम काळे यांना प्रोत्साहन मिळाले. कृषी विभागाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी वैभव काळे यांचा आदर्श घेऊन जिरेनियमची लागवड करावी. शेतकरी वैभव काळे म्हणाले, गादी वाफ्यात लागवडीऐवजी ४ फुटी बेड तयार करून बेडवर १ फुटावर रोपांची लागवड केली. एका एकरास जवळपास १० हजार रुपये खर्च आला. साधारण ४ महिन्यांत पीक कापणीसाठी आले. एका कापणीत साधारण १० ते १५ मेट्रिक टन उत्पादन मिळते. त्यापासून ३० ते ४० लिटर तेल मिळते. एका एकर क्षेत्रासाठी लागवडीसह ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.