आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संख्या बळ:"कोपरगावात पोलिसांचे‎ संख्या बळ वाढवावे‎ ; अधिकारी व कर्मचाऱ्यांची 22 पदे आहेत रिक्त‎

कोपरगाव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत‎ असून कोपरगाव ग्रामीण भागात ५५‎ गावे असल्याने पोलिसांचे‎ संख्याबळ कमी पडत आहे.‎ कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याला‎ ६ हवालदार, ५ पोलिस नाईक, १‎ सहायक पोलिस निरीक्षक व १०‎ पोलिस शिपाई यांची पदे रिक्त आहे.‎ ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी,‎ अशी मागणी जनतेतून होत आहे.‎ सध्या ग्रामीण पोलिस ठाण्याला १‎ पोलिस निरीक्षक, २ सहायक‎ पोलिस निरीक्षक, ४ सहायक‎ फौजदार, ५ पोलिस हवालदार, १२‎ पोलिस नाईक व ३२ पोलिस शिपाई‎ असे संख्याबळ देण्यात आले.‎ त्यापैकी १ पोलिस निरीक्षक, १‎ पोलिस उपनिरीक्षक, ४ सहायक‎ फौजदार, ४ पोलिस हवालदार, ५‎ पोलिस नाईक, १३ पोलिस शिपाई‎ आजमितीस कार्यरत आहे. ग्रामरण‎ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक‎ दौलत जाधव यांनी २१ नोव्हेंबर‎ २०२० ला पदभार स्वीकारला असून‎ त्यांच्या कारकीर्दीत अनेक गुन्हे‎ उघडकीस आले. सन २०२० साली‎ ५६६ गुन्हे दाखल करण्यात आले‎ होते. त्यापैकी ५३० गुन्हे उघडकीस‎ आले. तर सन २०२१ मध्ये ४३६ गुन्हे‎ दाखल करण्यात येऊन ३४४ गुन्हे‎ उघडकीस आणण्यात पोलिसांना‎ यश आले. मात्र दिवसेंदिवस‎ गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.‎ पोलिसांना तपास करतांना पोलिस‎ नसल्याने अडचणी येतात. तपासात‎ जनतेचे सहकार्य मिळत नसल्याची‎ खंत त्यांनी बोलून दाखवली. तरीही‎ कार्यकर्तृत्वाच्या बळावर आपले‎ कौशल्य पणाला लावून खून, दरोडे,‎ बलात्कार, वाळू माफिया,‎ निरनिराळे अपघातांचे तपास‎ लावण्यात यश मिळाले. त्यात‎ पोलिस संख्या बळ वाढवले, तर‎ काम करताना तारेवरची कसरत‎ थांबू शकेल, असे पोलिसांचे‎ म्हणणे. पोलिसांचे अपुरे संख्याबळ‎ असल्याने अतिरिक्त कामाचा ताण‎ येत असून त्यासाठी आवश्यक तेवढे‎ पोलिसांचे संख्याबळ गरजेचे आहे,‎ अशी मागणी करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...