आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर वाढवा ; गडाख

राहुरी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करावयाचा असेल तर सौर उर्जा, जैवइंधन या नैसर्गिक संसाधनाचा वापर जास्तीत जास्त करायला हवा, असे प्रतिपादन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख यांनी केले.राहुरी कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या सुचनेनुसार व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राध्यापक, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ व शेतकऱ्यांसाठी “सौर उर्जा सिंचन प्रणाली” या विषयावर दोन तुकड्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम जबलपूर- मध्यप्रदेश येथे बोरलॉग इनस्टिट्यूट ऑफ साउथ एशिया (बीसा) येथे ६ ते ८ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहे.या प्रशिक्षणासाठी ४० प्रशिक्षणाथींची तिसरी तुकडी सोमवारी रवाना झाली आहे.या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात बोरलॉग इनस्टिट्यूटचे प्रमुख पंकज सिंह, नवी दिल्ली येथिल परेश शिरसाठ,क्षितिज पांडे हे प्रशिक्षण देणार आहेत.यावेळी कास्ट प्रकल्पाचे डॉ. मुकुंद शिंदे यांनी या प्रशिक्षणाची माहिती दिली. यावेळी जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम कास्ट प्रकल्पाचे डॉ. सचिन सदाफळ व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...