आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवजारे वाटप:सूत्रकृमींचे नियंत्रण जैविक पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ ; विभाग प्रमुख डॉ. सी. एस.पाटील यांचे प्रतिपादन

राहुरी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैविक पद्धतींचा वापर करून सुत्रकृमीवर नियंत्रण केल्यास पिकांच्या उत्पादनात निश्चित वाढ होईल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी उपाययोजना कार्यक्रमांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, अखिल भारतीय समन्वित सूत्रकृमी संशोधन योजना व राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ८६ आदिवासी शेतकऱ्यांना डॉ. सी. एस. पाटील यांच्या हस्ते कृषी निविष्ठा व दैनंदिन वापरासाठी अवजारांचे वाटप करण्यात आले. यात बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, वैभव विळा,एक गोणी ट्रायकोडर्मा प्लस या साहित्याचा समावेश होता. डाॅ. पाटील म्हणाले सुत्रकृमीचे नियंत्रण जैविक पद्धतीने करता येते.त्यामध्ये फुले ट्रायकोडर्मा प्लस, पॅसिलोमायसिस लिलॅसिनस, निंबोळी पेंड इत्यादीचा वापर तसेच झेंडूचे आंतरपीक घेऊनही सुत्रकृमीचे नियंत्रण शक्य आहे. यावेळी उपस्थित शेतक-यांना सुत्रकृमीसाठी मातीचे नमुने घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमास कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय आघाव, कृषी सहाय्यक कडलग, शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...