आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कक्षातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह:जलजीवन च्या वाॅररूमध्ये ठेकेदारांची वाढली वर्दळ; सीईओ येरेकरांच्या कल्पनेतून स्वतंत्र कक्ष

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनच्या कामाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी स्वतंत्र वॉर रूम स्थापन केली. या कक्षात जलजीवन मिशनच्या सर्व फायलींवर कामकाज सुरू असते, परंतु सध्या या कक्षात ठेकेदारांचीच गर्दी वाढल्याने, कक्षातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जलजीवन मिशनचे कामकाज सुरू आहे. परंतु, या मिशनला गती देण्यासाठी कार्यकारी अभियंता आनंद रूपनर यांचा पदभार काढून जोशी यांना देण्यात आला. कोट्यवधी रूपयांच्या योजनांच्या फायली एका विभागातून दुसऱ्या विभागात शेरे नोंदवण्यासाठी जातात. परंतु, त्यात मोठा कालावधी जात होता. यापार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी येरेकर यांनी एकाच कक्षात सर्व फायलींची तपासणी सुरू केली. सीईओ यांच्यासह या कक्षात जाऊन संबंधित अधिकारी फायलींवर स्वाक्षरी करत आहेत. हा कक्ष उभारल्यानंतर सीईओ येरेकर यांचे जिल्हाभरात कौतूक झाले. परंतु, हा कक्ष आता ठेकेदारांच्या वर्दळीमुळे चर्चेत आला आहे.एकाच कक्षात फायली पहायला मिळत असून त्रुटीही लक्षात येत आहेत. तसेच किती अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी फाईलवर झाल्या, याचीही माहिती याच कक्षात मिळू शकते यासह विविध कारणांनी गर्दी वाढली आहे. मुळात या कक्षात ठेकेदारांना कोणी बोलावले, किंवा ते कशासाठी जातात ? याबाबत चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...