आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत:सौरपंप अन् सौरदिव्यांचा वापर वाढल्याने दररोज 50 हजारांची बचत; जैव इंधनाचा वापर टाळून नागरिक ई-बाईक्सकडे वळाले

अहमदनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजेची वाढती गरज पूर्ततेसाठी नागरिक स्वत:च पुढाकार घेऊन नैसर्गीक स्त्रोतापासून मिळणाऱ्या विजेचा थेट वापर करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सौर कृषी पंप, सौर दिवे तसेच सोलर वॉटर हिटरचा वापर कमालीचा वाढला आहे. त्याबरोबरच जैव इंधनाचा वापर टाळून नागरिक ई-बाईक्सकडे वळाले आहेत.

केंद्र सरकारने पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील बोजा कमी करण्यासाठी नैसर्गीक पद्धतीने ऊर्जा निर्मीती करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यातील ५५० शेतकऱ्यांनी अटल सौर पंप योजनेचा लाभ घेऊन वापर सुरू केला आहे. याव्यतिरिक्त सौर हायमास्ट, सौर पथदिवे, समाजकल्याण विभागांतर्गंत १२ वसतीगृहांत सौर प्रकल्प उभारणी केली आहे. नगर शहरात ६० ठिकाणी सौर हायमास्ट आहेत. याव्यतिरिक्त कर्जत, जामखेड, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहुरी, पाथर्डी आदी भागात ८० ठिकाणी पथदिवे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यात नवीन अपोर्टमेंटमध्ये आता सोलर वॉटर हिटरलाही कमालीची मागणी वाढली आहे. वॉटर हिटरमुळे वृक्षतोडीवर मर्यादा आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने जिल्ह्यात दररोज सुमारे ५० हजार रूपयांच्या वीजखर्चाची बचत झाली आहे.

६० दिवसांत ५५० ई बाईक्सची विक्री
पेट्रोल व डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्याने सर्वसामान्यांनी ई-बाईक्सचा पर्याय निवडला आहे. नगर शहरात मागील साठ दिवसांत सुमारे ५५० ई बाईक्सची विक्री झाली आहे.

अमृत योजनाही सौर ऊर्जेवर
अमृत योजनेंतर्गत महानगर पालिकेच्या पाणी योजनेसाठी १ हजार ६५० किलोवॅटच्या सौर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच शिर्डी नगर पंचायतीसाठी ५०० किलोवॅटचा सौर प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे सुमारे ८ हजार युनिटचा खर्च वाचणार आहे.

३ वर्षात १० कोटी खर्च
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत मागील ५ वर्षांत अटल सौर पंप योजना, सौर हायमास्ट योजना, वसतीगृहांसाठी सौर प्रकल्प योजनांवर तब्बल १० कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...