आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी मोहरम, दहीहंडी व गणेशोत्सवादरम्यान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी याबाबत माहिती दिली.
निचित म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ८ व ९ ऑगस्टला मोहरम, १९ ऑगस्टला दहीहंडी व ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सव कालावधीत प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी (समन्वय) म्हणून आर. जी. दिवाण (उपचिटणीस तथा नायब तहसिलदार -गृहशाखा, जिल्हाधिकारी कार्यालय ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या क्रमांकावर करा तक्रारी
स्वतंत्र नोडल अधिकारी (समन्वय) आर.जी.दिवाण यांचा भम्रणध्वनी संपर्क ९८९०९२९५१० व दूरध्वनी ०२४१/२३४५४४९ असा आहे. उत्सव काळात सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारींच्या निराकरणासाठी यांच्याशी संपर्क साधू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.