आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात भारताची ताकद वाढत असल्याने जगातील भारताचे शत्रू एकत्र येत आपल्यावर युद्ध लादण्याची शक्यता आहे. त्यास चोख उत्तर देण्यास आपण सक्षम आहोतच. भारताची वाटचाल रामराज्याच्या दिशेने होत आहे. हिंदुत्वाच्या राजसत्तेला समृद्धी व आयुरारोग्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी संकल्प व उपासना करणे आवश्यक आहे. यासाठी श्रीरामभक्ती व रामकार्याचे नियोजनबद्ध ध्यान करावे, असे िनरुपण राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांनी केले.
केडगाव ब्राह्मण सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रामकथा सप्ताहाच्या सांगता समारंभात आफळे बुवा यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमात आफळे बुवांच्या हस्ते घनपाठी महेशशास्त्री रेखे गुरुजी, पंढरपूरकर गुरुजी, इंजिनिअर अविनाश कुलकर्णी, पत्रकार भूषण देशमुख, डॉ.विश्वास मुळे व अनुराधा थिटे यांना ''ब्रह्मभूषण'' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अॅड.उमेश नगरकर, मिलिंद कुलकर्णी, राजकुमार जोशी, गजानन नेरीकर, अतुल देवचके, किशोर थत्ते यांचाही ब्रह्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चारुदत्त आफळे बुवा म्हणाले, न्यायाचे, जनतेचे, धर्माचे राज्य येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. त्यांना पूर्ण भारतात हिंदवी स्वराज्य म्हणजेच रामराज्यच निर्माण करायचे होते. दुर्दैवाने त्यांना कमी आयुष्यमान मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेत रामकथेचाच प्रत्यय येतोय. केडगाव ब्राह्मण सेवा संघाने दिलेले ''ब्रह्मभूषण'' पुरस्कार देण्याचे भाग्य मला मिळाले. तत्पूर्वी सज्जनगड येथील राघवेंद्रबुवा देशपांडे यांच्या श्री रामकथेचा समारोप शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने झाली. यानिमित्त केडगाव परिसरातून वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
सजवलेल्या रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाच्या मुर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. दुसऱ्या सजवलेल्या रथात कथाकार राघवेंद्र बुवा देशपांडे होते. ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटून व पुष्पवृष्टीने शोभायात्रेचे स्वागत नागरिक करत होते. महाप्रसादाने रामकथेचा भक्तिपूर्ण वातावरणात समारोप झाला. सांगता समारंभाचे सूत्रसंचालन संपदा देशपांडे यांनी, तर आभार भूषण पांडव यांनी मानले.
२५ वर्षांपासून धार्मिक व सामाजिक उपक्रमकेडगाव ब्राह्मण संघ गेल्या २५ वर्षांपासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या कार्यामुळे केडगाव ब्राह्मण संघाची राज्यात ख्याती पोहचली आहे, असे डॉ.श्रीकृष्ण जोशी म्हणाले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार.
केडगाव ब्राम्हण सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब्रह्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.