आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटोची निर्यात सुरू करावी:अनिल घनवट यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात सध्या कांदा व टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे भारतातून कांदा व टाेमॅटाे आयात करण्याची मागणी पाकिस्तानकडून होत आहे. भारताने तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पंतप्रधान व परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना सोमवारी (5 सप्टेंबर) पत्र पाठवून केली आहे.

पाकिस्तानात अतिवृष्टी व महापुरांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर400 रुपये प्रति किलो व टमट्याचे दर 500 रुपये झाले आहेत. तसेच हे दर प्रति किलो 700 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग, भारतातून कांदा व टाेमॅटाे आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत.

भारतात सध्या शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा सडत आहे व भाव कमी झाल्याने टाेमॅटाे रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टाेमॅटाे निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केली आहे. सीमेवर कारगिलचे युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानला मदत करण्याच्या हेतूने नव्हे, तर भारतातील कांदा व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्यात सुरू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र व्यवहार मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून त्यांनी कांदा व टाेमॅटाे निर्यात तातडीने सुरू करण्याची विनंतीही घनवट यांनी केली आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटोची निर्यात सुरू केल्यास भारतासह महाराष्ट्रातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असेही घनवट यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...