आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:जैविक कीटकनाशकात भारत जगाचा हब होणार

कोपरगाव शहर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात सेंद्रिय शेतीत येत्या काळात क्रांती घडणार आहे. कृषी सूक्ष्म जीव उत्पादक व शेतकरी संघटना अर्थात “आम्मा असोसिएशन”च्या वतीने संशोधित केलेले नऊ जैविक कीटकनाशके नोंदणीच्या अंतिम टप्प्यात आहे. जगाला सेंद्रिय शेतीसाठी आम्माचे हे कीटकनाशके दिशादर्शक ठरणार आहेत. जैविक कीटकनाशकात भारत जगाचा हब होईल, अशी माहिती आम्माचे प्रेसिडेंट कीड तज्ञ, शास्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली.

डॉ. वाघचौरे म्हणाले, केमिकल उद्योगात ज्या प्रमाणे चीनने भरारी घेतली त्याच धर्तीवर भारत ही जैविक कीटकनाशकाचा पुरवठादार ठरेल तसेच भविष्यातील सेंद्रीय शेतीचा वेध घेण्यासाठी २०१७ साली आम्मा असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यातून नऊ कीटकनाशकांचा डाटा तयार करण्यात आला. पूर्ण भारतातील ५४ विद्यापीठातून तब्बल १४ जैविक कीटकनाशकांची नोंद होत आहे. “जैविक किटकनाशके व त्याचे भवितव्य” या विषयांवर आम्मा असोसिएशन नाशिकच्या वतीने गोवा येथे नुकतीच राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेसाठी केंद्रीय किटकनाशक मंडळ (फरिदाबाद ) व एन बी ए आय एम ( उ. प्र. ) तसेच देशभरातील विविध कृषी विद्यापीठांचे शास्रज्ञ व जैव उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. आम्म्माच्या ९ जैविक किटकनाशकांच्या डेटा संदर्भातील कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. जैविक किटकनाशकांची सीआयबी नोंदणी प्रक्रिया आम्माच्या मदतीने सुलभ होणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी राष्ट्रीय कृषी उपायुक्त जिवाणू प्राधिकरणचे संचालक डॉ. आलोक कुमार श्रीवास्तव, केंद्रीय किटकनाशक संस्थेचे संचालक डॉ. के .एल गुर्जर, डॉ. हिलोल चकदार ,माजी संचालक डॉ. अनिल सक्सेना ,राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. देवकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्माचे सचिव प्रशांत धारणकर ,उपाध्यक्ष डॉ. रामनाथ जगताप यांनी प्रयत्न केले. प्रशांत धारणकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...