आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय शुगरकडून गौरव:सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला भारतीय शुगरचा बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लान्ट पुरस्कार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला भारतीय शुगरचा बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लान्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम ज्युस टू इथेनॉल उत्पादन घेत अनेक रासायनिक उपपदार्थ प्रकल्प साकारले आहेत. भारतीय शुगर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने कारखान्याची बेस्ट इनोव्हेटीक शुगर प्लान्ट पुरस्कार देऊन गौरव केला.

हा पुरस्कार स्वर्गीय शंकरराव कोल्हे व सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या चरणी समर्पित करत आहे, अशी माहिती कोपरगावच्या कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.

विमाननगर पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय शुगर संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, एनएसआय कानपूर संस्थेचे डायरेक्टर नरेंद्र मोहन, चीफ एडिटर संग्रामसिंह शिंदे यांच्या हस्ते कोल्हे कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विवेक कोल्हे म्हणाले, चालू वर्षी कारखान्याने उच्चांकी गाळप केलेली असून संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची घोडदौड अशीच कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यापुढेही सुरू ठेवला आहे.

ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देऊन शेतकरी समृद्ध व्हावा हे माजीमंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सात दशके संघर्ष करत देश विदेशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नावलौकीक वाढवला. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडराव, संचालक ज्ञानेश्वर परजणे, विश्वास महाले, बापुसाहेब बारहाते, नीलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, अप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलास वाबळे, विलास माळी, त्र्यंबक सरोदे, सतीश आव्हाड, उषा औताडे, सोनिया पानगव्हाणे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, अ‌ॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, रासायनिक विभागाचे प्रोडक्शन मॅनेजर टी. व्ही. देवकर, एचआर मॅनेजर प्रदीप गुरव, बायोगॅस विभागाचे पी. एस. अरगडे, शुगर गोडाऊन इन्चार्ज भास्करराव बेलोटे आदी उपस्थित होते.

कारखान्याचा अनेक संस्थाकडून गौरव

केंद्र व राज्य शासन तसेच नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, नेशनल हेवी, इफको, कृभको नवी दिल्ली आदी संस्थांनी कोल्हे कारखान्यास देश व राज्य पातळीवर विविध 25 पारितोषिके देऊन गौरवले आहे, असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...