आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनगौरव पुरस्कार:इंद्रनाथ थोरात यांना लोकहक्क‎ फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार‎

श्रीरामपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकहक्क फाउंडेशनच्या वतीने‎ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा‎ करण्यात आली असून प्रा. डॉ.‎ प्रल्हाद लुलेकर, शाहीर संभाजी‎ भगत, शमशोद्दीन तांबोळी यांना‎ विविध विचार प्रसार पुरस्कार, तर‎ इंद्रनाथ पाटील थोरात यांना‎ जीवनगौरव पुरस्कार येत्या ७‎ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार‎ असल्याची माहिती आमदार लहू‎ कानडे यांनी दिली.‎

माजी आमदार आर. डी. पवार‎ स्मरणार्थ आंबेडकरी विचार, प्रसार‎ पुरस्कार, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर‎ औरंगाबाद यांना, कॉम्रेड गोविंद‎ पानसरे स्मरणार्थ प्रागतिक‎ विचार-प्रसार पुरस्कार शाहीर‎ संभाजी भगत मुंबर्इ यांना, ज्येष्ठ‎ गांधीवादी विचारवंत बाळासाहेब‎ भारदे स्मरणार्थ गांधी विचार-प्रसार‎ पुरस्कार शमशोद्दीन तांबोळी पुणे‎ यांना तसेच श्रीरामपूर तालुक्यातील‎ सामाजिक, राजकीय कार्यासाठीचा‎ जीवनगौरव पुरस्कार इंद्रनाथ थोरात‎ यांना जाहीर झाले आहे.

याशिवाय‎ श्रीरामपूर तालुक्यातील गुणवंतांचा‎ गुणगौरव मराठी साहित्य संमेलनाचे‎ माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत‎ उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते, तर‎ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे‎ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.‎ लोकनेते अामदार बाळासाहेब‎ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त‎ मंगळवारी, ७ फेब्रुवारी रोजी‎ सायंकाळी ५ वाजता बेलापूर रोड,‎ श्रीरामपूर येथील यशोधन, आमदार‎ लहू कानडे यांचे जनसंपर्क‎ कार्यालय आवारात भव्य समारंभात‎ हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार‎ आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे,‎ असे आवाहन आमदार लहू कानडे‎ यांनी केले. दरम्यान, इंद्रभान थोरात‎ यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे‎ त्यांचे तालुक्यासह जिल्ह्यातून‎ विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून‎ अभिनंदन होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...