आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त विधान:इंदुरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, पुत्रप्राप्ती संदर्भात वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण

संगमनेर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सम-विषम तिथीला स्त्री-पुरुष संबंध आल्यास पुत्रप्राप्ती होते, असे विधान केले होते'

पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कोर्टाने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना संगमनेर येथील न्यायालयाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सूचनेवरून संगमनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर यांनी न्यायालयात दाखल केलेली तक्रार व पुराव्यांवरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांनी शुक्रवारी हे आदेश दिले.

पाच महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी सम-विषम तिथीला स्त्री-पुरुष संबंध आल्यास पुत्रप्राप्ती होते, असे विधान केले होते.

वारकरी संप्रदायाच्या विरोधात आम्ही नाही...

इंदुरीकर महाराजांचे विधान कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. स्त्रियांविषयी ते अश्लाघ्य बोलत असतात. त्यांना समर्थन करणारे लोक वारकरी संप्रदाय किंवा सामाजिक संघटनेचे नसून फक्त लाभार्थी आहेत. त्यांनी आम्हाला वारकरी संप्रदायाची परंपरा शिकवू नये, अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...