आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारायण सोहळा:अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी‎ समाजावर संतांचे अनंत उपकार‎

कोपरगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परमार्थ हे महाधन आहे, परमार्थ धन‎ देवापर्यंत घेऊन जाते. म्हणून मनुष्य‎ जीवनात परमार्थ फार महत्त्वाचा आहे,‎ ज्या घरात परमार्थ धन आहे तेथे‎ मिळवलेले धन टिकते, म्हणून संतांनी जे‎ दिले ते अति श्रेष्ठ आहे. संत महात्मे हे‎ समाजाला देण्यासाठी येत असतात,‎ अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर‎ काढण्यासाठी समाजावर संतांचे उपकार‎ आहेत, असे निरुपण नेवासेचे महंत उद्धव‎ महाराज मंडलिक यांनी केले.‎

काेपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र‎ हिंगणी येथे वै. जोग महाराज पुण्यतिथी‎ उत्सव व योगीराज तुकाराम बाबा यांची‎ पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव निमित्त सुरू‎ असलेल्या तुकाराम महाराज गाथा‎ पारायण सोहळा व हरिनाम सप्ताहात‎ किर्तनात ते बोलत होते.‎ उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,‎ महात्म्यांनी समाजाला जागवले आणि‎ जगवलेही. "इवलेसे रोप लावियेले द्वारी‎ त्याचा वेलू गेला गगनावरी" या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माऊलींच्या उक्तीप्रमाणे महात्म्यांनी चालू‎ केलेले कार्य अविरत चालू आहे. हा‎ ज्ञानाचा भक्तीच्या प्रेमाचा वर्षाव त्यांनी‎ केला. ही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. गायनाचार्य मनोहर महाराज‎ कोठेकर व विठ्ठल महाराज सुलदलीकर‎ तर मृदंग वादक मंगेश महाराज जाधव‎ यांनी साथ दिली.‎

वै. जोग महाराज पुण्यतिथी उत्सव व प.पू. योगीराज तुकाराम बाबा यांची पुण्यतिथी‎ सुवर्ण महोत्सव निमित्ताने किर्तनात बोलताना उद्धव महाराज मंडलिक.‎दशरथे महाराज यांच्या किर्तनाने होईल साेमवारी सप्ताहाची सांगता‎या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी, ६ फेब्रुवारी रोजी उमेश महाराज दशरथे‎ यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे.दररो ज सकाळी ८ ते ११ गाथा पारायण,‎ सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. गाथा पारायण‎ सोहळ्यासाठी ४०० भाविक बसलेले आहेत.

दशरथे महाराज यांच्या किर्तनाने होईल साेमवारी सप्ताहाची सांगता‎या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी, ६ फेब्रुवारी रोजी उमेश महाराज दशरथे‎ यांच्या काल्याचे किर्तनाने होणार आहे.दररो ज सकाळी ८ ते ११ गाथा पारायण,‎ सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तन याप्रमाणे कार्यक्रम होत आहेत. गाथा पारायण‎ सोहळ्यासाठी ४०० भाविक बसलेले आहेत. दररोज सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण व‎ संध्याकाळचा महाप्रसाद याप्रमाणे नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रम चालू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...