आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी:राहता बाजार समितीत 19 हजार 146 क्रेट डाळिंबाची आवक; प्रतिकिलो 175 रुपयांपर्यंत मिळाला भाव

अहमदनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (7 ऑगस्ट) 19 हजार 146 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो 121 ते 175 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 81 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

भावात चढउतार सुरूच

नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र 76 हजार 172 हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टर क्षेत्र डाळिंब बागाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात. राहाता बाजार समितीत रविवारी शेतकऱ्यांनी 19 हजार 146 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 121 रुपये ते 175 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 81 ते 120 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 41 ते 80 रुपये, तर चार नंबर दर्जाच्या डाळिंबांना प्रतिकिलो 10 ते 40 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मागील आठवड्यापासून भावात किंचीत चढउतार होत आहे.

असा मिळाला भाव

राहाता बाजार समितीत रविवारी 18 हजार 236 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 750 ते 1150 रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये भाव मिळाला. तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 800 ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीने दिली.

बातम्या आणखी आहेत...