आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसेंदिवस वाढत जाणारे सामाजिक, धार्मिक कलह, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हि सर्व परिस्थिती जर बदलायची असेल, तर त्या बदलाची सुरुवात आपल्या स्वतःपासून आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यापासून करा. एक दिवस ही परिस्थिती बदललेली असेल, असे मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी केले.
येथील संकल्पना फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा पहिला सेवा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सामूहिक कृतीची गरज आहे. कोपरगाव तालुक्यातील कला, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव निस्वार्थ भावनेने संकल्पना फाउंडेशनने केला, ही अभिमानस्पद बाब आहे, असे जगताप यावेळी म्हणाले.
यावेळी सुधीर डागा, प्रा. फय्याज खान पठाण, प्रा. डॉ. सुनील कुटे यांना सेवागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे होते. आमच्या कार्याची दाखल घेऊन केलेला सेवागौरव नक्कीच नव्या उमेदीने काम करण्याचे बळ देईल, असे पुरस्कारार्थी यांनी व्यक्त केले. या सन्मान सोहळ्यास माजी जि. प. सदस्य राजेश परजणे, संदीप रोहमारे, सिने अभिनेते चंद्रकांत शिंदे, डॉ. संजय उंबरकर, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सुहासिनी कोयटे, स्वाती कोयटे, डॉ. योगेश लाडे, राजेश ठोळे, आदिनाथ ढाकणे, राम थोरे, विकास किर्लोस्कर, महारुद्र गालट, डॉ. प्रकाश पहाडे, स्वाती मुळे, यतिन माझिरे, वैभव नवसकर, कृष्णा चतुर्भुज, माणिक खटिंग आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. किरण लद्दे, वैभव बिडवे, आरती सोनवणे, कल्पना निंबाळकर, सुनीता इंगळे, कैलास नाईक, प्रमोद सानप, रोहित शिंदे, आकाश खंडागळे, प्रथमेश पिंगळे, प्रसाद सोनवणे, गायत्री कुलकर्णी, योगेश काले, आरती कोरडकर, आश्लेषा सानप, राहुल सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गणेश सपकाळ व आभार आरती सोनवणे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.