आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कामगारांचे धरणे आंदोलन, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने कॉम्रेड जीवन सुरूडे यांचा पुढाकार

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलापूर बुद्रूक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेलापूर ग्रामपंचायती पुढे महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने कॉम्रेड जीवन सुरूडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन केले.

बाबासाहेब प्रधान, राजेंद्र भिंगारदिवे, अशोक राऊत, नंदकुमार गायकवाड, म्हाळू खोसे, रविंद्र मेहेत्रे, रमेश लगे, दत्तात्रय वक्ते, योगेश आमोलिक, बाबासाहेब लोंढे, सचिन नगरकर, सचिन साळुंके, अमोल साळवे, संकेत मोडके, अनिल गाढे, किरण खरोटे, रवींद्र बागडे, अविनाश तेलोरे, अविनाश शेलार, असिफ ठाकूर, श्याम भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, उज्ज्वला मिटकर, अलका भिंगारदिवे, सुशीला खरात, सरस्वती बागडे, निर्मला तेलोरे, सगुणा तांबे, कलाबाई शेलार, निर्मला भिंगारदिवे, निर्मला गाढे आदी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कामगारांना महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, कामगारांचे वेतन १० तारखेच्या आत जमा करावे,अनेक महिन्यापासून थकीत फंडाचे हफ्ते तातडीने भरणे,ग्रामपंचायतीतील सर्व कामगारांचे भविष्य निर्वाह निधी,नाशिक येथे खाते उघडणे, ग्रामपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधनुसार कामगार भरून, आकृतीबंधात वाढ करणे कामी प्रस्ताव पाठवणे यासह विविध मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे आदींनी सर्व प्रश्नाबाबत संघटनेशी चर्चा करून कामगारांचे वरील प्रश्न तातडीने सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...